खेड येथे खाजगी बस व दुचाकी अपघातात एक जण ठार.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील भरणे गोवळवाडी येथे एक खासगी बस व दोन दुचाकी अशा तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. हा अपघात रविवारी (दि.1) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास झाला.या अपघातात एकजण ठार तर तिघेजण जखमी झाले आहेत. मुबीन हुसेन नाडकर (वय 28, रा. संगलट, खेड) असे मृत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर रवींद्र सुतार, सांची सुतार आणिा राहुल सुतार अशी जखमींची नावे आहेत.याबााबतची माहिती अशी की, रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास खेडवरून एक खासगी आरामबस (एम एच 06 एस 9731) मुंबईच्या दिशेने जात होती. त्याचवेळी मुंबईच्याच दिशेने जात असलेल्या दुचाकी (एम. एच. 08 ए के 2933) ला या बसची जोराची धडक बसली.
ही धडक बसल्यानंतर पहिल्या दुचाकीची पुढे चाललेल्या दुसर्या दुचाकीला (एम. एच. 08 ए एस 9241) ला धडक बसली.दरम्यान झालेल्या या अपघातात पहिल्या दुचाकीचा चालक मुबीन हुसेन नाडकर याचा जागीच मृत्यू झाला असून त्याला खासगी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले तर दुसर्या दुचाकीवर बसलेले रवींद्र सुरेश सुतार (33), सांची रवींद्र सुतार (7 वर्ष) व राहुल संतोष सुतार (सर्व रा. कळंबणी) हे तिघे जखमी झाले