
कोकण मार्गावरून धावणारी जबलपूर-कोईतपूर धावली ५ तास विलंबाने.
कोकण मार्गावरून धावणारी जबलपूर-कोईमतूर गाडी रविवारी ५ तास विलंबाने धावल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली. विकेंडलाच उशिराने धवलेल्या गाडीमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. गाडी विंबाने धावण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही. या गाडीपाठोपाठ एलटीटी-मडगांव एक्सप्रेस सीएसटी-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेसही १ तास उशिराने रवाना झाली. गोवा संपर्कक्रांतीसह निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्सप्रेसलाही एक तासाचा लेटमार्क मिळाला. www.konkantoday.com