व्यावसायिक गॅस सिलेंडर दरवाढ

सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात आणि त्याअंतर्गत इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने गॅसच्या किमती वाढवल्या आहेत. ही वाढ 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी करण्यात आली असून सामान्य एलपीजी म्हणजेच घरगुती 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. व्यावसायिक LPG सिलिंडरचे नवीन दर आज 1 डिसेंबर 2024 पासून देशभरात लागू झाले आहेतमुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात 16.50 रुपयांनी वाढ झाली असून तो 1771 रुपये प्रति सिलिंडरवर आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button