पेढे-सवतसडा येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या पेढे येथील तरुणाचे उपचारादरम्यान निधन.
मुंबई-गोवा महामार्गावर पेढे-सवतसडा येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या पेढे येथील दीपक ईश्वर पवार (२४) या तरुणाचे शनिवारी कराड येथील रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.बुधवारी मतदानाच्या दिवशी परशुराम येथून पेढेकडे येत असताना महामार्गावर सवतसडा येथे रस्त्यावर आलेल्या खडीवरून दीपक याची दुचाकी घसरून अपघात घडला. यामध्ये दीपकच्यां डोक्याला मार लागला. त्याला येथे खासगी रूग्णालयात सुरूवातीला दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला अधिक उपचारासाठी कराड येथे हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचे निधन झाले. शनिवारी सायंकाळी उशिरा पेढे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मूळचे विजापूर-कोगुटनुर येथील असलेले पवार कुटुंबिय हे गेल्या ३० वर्षांपासून येथे वास्तव्यास आहेत. दीपक हा सध्या लोटेतील कंपनीत कामाला होता. त्याच्या अकाली निधनाने पेढेसह सर्वत्र शोककळा पसरली आहे.