
खेड-भैरीभवानी नगरात डेंग्यूचा वाढता फैलाव.
खेड शहरातील भैरीभवानी नगर येथील डेंग्यूच्या साथीने डोके वर काढल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. डेंग्यूसदृश रूग्ण खासगी रूग्णालयामध्ये उपचार घेत असल्याने रूग्णांचा नेमका आकडा समोर आलेला नाही. मात्र डेंग्यूसदृश रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाही आरोग्य यंत्रणा अजूनही सुस्त असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच एका २२ वर्षीय तरूणाचाही डेंग्यूनेच मृत्यू झाल्याचा प्रकार घडला होता.
शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. डेंग्यूची साथ रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून अद्यापही कुठल्याच ठोस उपाययोजनांचा अवलंब करण्यात आलेला नाही. डेंग्यूसदृश साथीने नागरिक त्रस्त असतानाही नगर प्रशासनाकडून अद्याप डासप्रतिबंधक फवारणी करण्याची तसदी घेतलेली नाही.
वाढत्या डासांच्या उत्पत्तीपाठोपाठ डेंग्यूसदृश रूग्ण आढळत असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. आरोग्य यंत्रणेनेही ही बाब गांभीर्याने घेवून तातडीने सर्वेक्षणासह डासप्रतिबंधक फवारणी करण्ययाची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.www.konkantoday.com