कोत्रेवाडीतील डंपिंग ग्राऊंड प्रकरणी जिल्हाधिकार्यांच्या आदेशानंतरही पत्र देण्यास टाळाटाळ.
जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशानंतरही पत्र देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी यांच्या भूमिकेबाबत कोत्रेवाडी ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.लांजा कोत्रेवाडी येथे होणार्या डंपिंग ग्राऊंड प्रकल्पाच्या विरोधात ग्रामस्थांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत कोत्रेवाडी ग्रामस्थांची एक बैठक जिल्हाधिकारी यांच्या दालनात १८ नोव्हेंबर रोजी पार पडली होती.यावेळी कोत्रेवाडी ग्रामस्थांनी आपण बहिष्कार का टाकला आहे याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना लांजा नगर पंचायतीने कोत्रेवाडी येथे जोरजबदरस्तीने डंपिंग ग्राऊंड करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगितले. विशेष बाब म्हणजे हा डंपिंग ग्राऊंड प्रकल्प लोकवस्तीपासून अगदी जवळ असून येथे जाण्यासाठी अधिकृत रस्ता नाही. त्या ठिकाणी जलस्त्रोत आहेत. त्यामुळे भविष्यात गमिस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.www.konkantoday.com