केजरीवाल यांच्यावर फेकलेले द्रव पाणी होते.
आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावरील हल्ल्यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी मोठा दावा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील ग्रेटर कैलासमध्ये केजरीवाल यांच्यावर झालेला हा हल्ला, इतर कुणी नव्हे तर एका बस मार्शलने केला होता.तसेच, केजरीवाल यांच्यावर फेकलेले द्रव पाणी होते. अरविंद केजरीवाल ग्रेटर कैलासमध्ये पदयात्रा करत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला.
हल्ल्यानंतर पोलिसांनी लगेचच आरोपीला पकडले होते. अशोक झा असे या आरोपीचे नाव आहे. या हल्ल्यानंतर, संबंधित आरोपी हा भाजपचा औपचारिक सदस्य असल्याचा आरोप आप केला आहे. मात्र, दिल्ली पोलिसानी हा आरोपी बस मार्शल असून त्याने केजरीवाल यांच्यावर पाणी फेकल्याचे म्हटले आहे.पोलिसांनी सांगितले की, आप नेत्यांनी मालवीय नगर भागात पदयात्रेचे आयोजन केले होते, परंतु त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. चौपाल सावित्री नगर येथून सुरू झालेली ही पदयात्रा मेघना मोटर सावित्री नगर येथे संपली. या यात्रेत अरविंद केजरीवाल प्रमुख पाहुणे म्हणून होते. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चोख पोलीसबंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.पोलिसांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल सायंकाळी 5.50 वाजताच्या सुमारास लोकांशी हस्तांदोलन करत होते. दरम्यान, अशोक झा नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर पाणी फेकण्याचा प्रयत्न केला.
मात्र तेथे आधीच पोलीस कर्मचारी उपस्थित असल्याने आरोपीला तत्काळ पकडून ताब्यात घेण्यात आले. ही व्यक्ती खानापूर आगारात बस मार्शल म्हणून कार्यरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिने अरविंद केजरीवाल यांच्यावर पाणी का फेकले याचा अधिक तपास केला जात आहे.अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सौरभ भारद्वाज यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेली त्यांनी, अरविंद केजरीवाल यांच्यावर कथित द्रव फेकणारी व्यक्ती भाजपची सदस्य असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, अरविंद केजरीवाल यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असून आरोपीच्या फेसबुक प्रोफाईलवरून आरोपी भाजपचा सदस्य असल्याचे समते.
आरोपीच्या एका हातात स्पिरिट आणि दुसऱ्या हातात माचिस होती. तो प्रिरिट फेकण्यात तर यशस्वी झाला पण पेटवू शकला नाही. त्यापूर्वीच त्याला पकडण्यात आले.