सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निधी संकलन शुभारंभ शौर्यपदकधारक तथा वीर नारी सत्कार समारंभाचे आयोजन
रत्नागिरी, दि.30 : सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निधी संकलन शुभारंभ व शौर्यपदकधारक तथा वीर नारी सत्कार समारंभ मंगळवार 10 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला विशेष अतिथी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे उपस्थित राहणार आहेत. तरी कार्यक्रमाला आजी-माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता, माजी सैनिक पत्नी, पाल्य यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी व सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राजू शामराव सावंत यांनी केले आहे.