
वनशक्ती संस्थेतर्फे भारतातील पहिली समुद्रतळ स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ.
सागराच्या तळाशी प्लास्टिक बॉटल, पिशव्या, जाळी अश्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचा कचरा साठत असून यापासून सागरी परिसंस्थेचे जतन करण्याच्या हेतूने वनशक्ती संस्थेतर्फे भारतातील पहिली समुद्रतळ स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ मालवणच्या समुद्रात यशस्वीरीत्या झाला.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, भारतीय मत्स्य सर्वेक्षण, मुंबई, नीलक्रांती संस्था आणि युथ बीट फॉर क्लायमेट यांसह पर्यटनव्यावसायिक यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या मोहिमेत किल्ले सिंधुदुर्ग नजीकच्या समुद्रात स्थानिक स्वयंसेवक, स्कुबा डायवर्स, पर्यावरणवादी आणि सागरी तज्ज्ञांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे समुद्रतळातून ३०० किलोग्रॅम जैवविघटनशील नसलेला कचरा काढण्यात आला, अशी माहिती वनशक्ती संस्थेचे संचालक स्टॅलिन दयानंद यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान ही मोहीम अशीच सातत्याने घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
वनशक्ती व इतर संस्थांच्या सहकार्यातून मालवणच्या समुद्रातील सिंधुदुर्ग किल्ल्या पासून जवळ असलेल्या रापण या समुद्री परिसरात समुद्री कचरा स्वच्छता मोहीम सकाळी राबविण्यात आली