रत्नागिरी शहरातील मिकरवाडा मच्छिमार बंदरात सिलिंडरच्या गळतीमुळे मच्छिमार नौकेला आग.
रत्नागिरी शहरातील मिकरवाडा या गजबजलेल्या मच्छिमार बंदरात पर्ससीन मासेमारी नौकेवरील स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलिंडरने अचानक पेट घेतला. यामुळे नौकेला आग लागली. परंतु हा सिलिंडर पाण्यात फेकण्यात आला. यामुळे आग आटोक्यात आली.बुधवारी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास सारसी ही नौका खोल समुद्रात मासेमारी करून मिरकरवाडा बंदरात नांगरण्यात आली. खलाशी आपापली कामे आटपत होते. एवढ्यात त्या सिलिंडरने पेट घेतला. ४-५ खलाशांनी पाण्याच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अखेरीस सिलिंडर पाण्यात फेकण्यात आला. त्यामुळे आग आटोक्यात आली.www.konkantoday.com