एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये पदभार स्वीकारावा सर्व आमदारांची इच्छा इच्छा- उदय सामंत.
महायुतीचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी काल गुरुवारी गृहमंत्री अमित शाहा आणि भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत बैठक घेतली. परंतु, ही बैठक संपल्यानंतर मुंबईत परतलेले एकनाथ शिंदे अचानक गावाला गेल्यानं राजकीय पटलावर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अशातच शिवसेनेचे नेते आणि आमदार उदय सामंत यांनी मोठी प्रतिक्रिया दिलीय.”कोणत्याही प्रकारची नाराजी नाहीय. तब्येत ठीक नसल्याने एकनाथ शिंदे त्यांच्या गावी गेले आहेत.
काल सन्मानपूर्वक मिटिंग झाली. 60 आमदारांनी मिळून शिंदेंना मेसेज दिलाय की, त्यांनी उपमुख्यमंत्री बनावं. एकनाथ शिंदे स्वत: याचा निर्णय घेतील. प्रत्येक निवडणुकीत असच होतं. आधी मतदान कमी होतं. दुपारनंतर मतदान जास्त होतं. झारखंडमध्येही असच झालं आहे. अमित देशमुख आणि आशिष देशमुखही लढले. पण एक जिंकला आणि एक हरला. त्यामुळे ईव्हीएमआरोप करणं चुकीचं आहे.ते (एकनाथ शिंदे) सरकारमध्ये असणे गरजेचं आहे. लाडकी बहीण योजना त्यांनी सुरु केली. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक होईल. त्या बैठकीत मंत्रिमंडळाबाबत सखोल चर्चा केली जाईल. एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील व्हावे, अशी आमची इच्छा आहे. त्यांनी सरकारमध्ये पदभार सांभाळावं, असं आम्ही सर्व आमदारांनी त्यांना सांगितलं आहे. कारण आम्ही सर्व त्यांच्या आधारावर निवडणूक लढले आहोत. ते आमचे नेते आहेत. ते सरकारमध्ये असले पाहिजेत. आता त्यांची काय इच्छा आहे, यावर ते सतत विचार करत आहेत”, असंही उदय सामंत म्हणाले.