उद्धव ठाकरे यांनी विनंती केल्यावर बाबा आढाव यांनी उपोषण सोडले.

समाजसेवक बाबा आढाव यांनी पुण्यात उपोषण सुरु केले आहे. त्यांचा उपोषणाच्या तिसरा दिवस होता. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत बाबा आढाव यांनी आत्मक्लेष आंदोलन केले.शनिवारी अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या भेटी घेतल्या. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची बाबा आढाव यांची भेट घेतली. त्यानंतर दुपारी शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपोषणस्थळी आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विनंती केल्यावर बाबा आढाव यांनी उपोषण सोडले. परंतु उपोषणस्थळी येण्यासाठी विमानाऐवजी उद्धव ठाकरे थेट रस्ते मार्गाने आले. त्याचा खुलासाही यावेळी करण्यात आला.बाबा आढाव यांनी २८ नोव्हेंबरपासून उपोषण सुरु केले होते. उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले की, तुम्ही आता आत्मक्लेष करुन घेऊ नका. तुमचे हे आंदोलन पुढे नेण्याचे काम महाविकास आघाडीकरणार आहे. ज्यांना ज्यांना वाटते चुकीचे झाले आहे, ते आमच्या बरोबर येतील. त्यानंतर राज्यभर मोठे जनआंदोलन उभारले जाणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच बाबा आढाव यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. त्यानंतर बाबा आढाव यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ज्यूस घेत उपोषण सोडले.बाबा आढाव यांच्या उपोषणस्थळी येण्याची उद्धव ठाकरे यांनी घाई झाली होती. कारण त्यांना बाबांचे उपोषण लवकर सोडवायचे होते. मुंबईवरुन तीन वाजता उद्धव ठाकरे यांचे विमान होते. त्या विमानाने आले असते तर पुण्यात पोहचण्यास उशीर झाला असता. यामुळे उद्धव ठाकरे यांनी रस्ते मार्गाने येण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे दुपारी चारपर्यंत ते उपोषण स्थळी पोहचले. त्यानंतर मनोगत व्यक्त करुन बाबा आढाव यांना उपोषण सोडण्यास सांगितले.यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारची स्थापना होत नसल्याबद्दल महायुतीवर जोरदार टीका केली. तसेच एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. उद्धव ठाकरे म्हणाले, एवढे प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर राजभवनात जाण्याऐवजी शेतात का जातात आहेत. अमावस्येचा दिवस का निवडत आहेत. त्यांची मुख्यमंत्री कोण होणा किंवा उपमुख्यमंत्री कोण होता याची काहीच तयारी नाही. बहुमत मिळाल्यावर त्यांच्याकडे आनंदोत्सव नाही. सर्वांचे चेहरे पडले आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button