
तर त्यांची दादागिरी मोडून काढू-आमदार राजन साळवी
महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता रात्रंदिवस झगडणा-या आरोग्य व पोलीस प्रशासनासोबत जर कोणी दादागिरी करत असेल तर त्यांची दादागिरी मोडून काढायला प्रशासनासोबत रस्त्यावर उतरु असा इशारा राजापुरचे आमदार राजन साळवी यांनी दिला आहे. नुकताच रत्नागिरी शहरातील राजिवडा भागात एक रुग्ण आढळुन आला तेथील माजी लोकप्रतिनिधीने आरोग्य यंत्रणेच्या कर्मचारी वर्गाला धमकावण्याचा प्रकार करुन परत पाठवले याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो असेही साळवी यांनी म्हटले आहे
www.konkantoday.com