नाशिकच्या खैर तस्करीची पाळेमुळे चिपळूणच्या सावर्डेपर्यंत
नाशिकच्या खैर तस्करीची पाळेमुळे चिपळूणच्या सावर्डेपर्यंत पसरल्याचे मंगळवारी समोर आले आहे. नाशिकच्या खैर तस्करीचा तपास करतानाच चिपळूणचे धागेदोरे मिळाल्याने मंगळवारी नाशिक वनविभागाच्या पथकाने सावर्डे परिसरात कात तयार करणार्या ३ फॅक्टरींवर धाड टाकली. या धाडीत फॅक्टरीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध खैरसाठा केल्याचे निदर्शनास आल्याने एका फॅक्टरीचे गोडावून सील करण्यात आले आहे. तर दुसर्या फॅक्टरीला नोटीस बजावण्यात येणार आहे.
नाशिकच्या खैर तस्करी प्रकरणामध्ये आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील २ आरोपी उत्तर प्रदेशचे रहिवासी असून उर्वरित दोन आरोपी हे गुजरातचे रहिवासी आहेत. काही दिवसांपूर्वीच खैर तस्करीचे धागेदोरे दहशतवादाशी जोडले गेल्यामुळे दहशतवाद विरोधी पथकाने सावर्डे, दहिवली येथे कारवाई करत मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल करून ६ आरोपींना अटक केली होती. www.konkantoday.com