नव्या सरकारने नाणार रिफायनरी प्रकल्प साकारावा, दशक्रोशी रिफायनरी समर्थक समिती नव्या सरकारकडे करणार मागणी.

राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प विजयदुर्ग बंदरासह नाणार परिसरात व्हावा, अशी मागणी विल्ये (नाणार) दशक्रोशी रिफायनरी समर्थक समिती नव्या सरकारकडे करणार आहे. त्याकरिता महायुतीच्या कोकणातील सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार दरबारी भेट घेवून शेतकर्‍यांची हजारो एकर संमतीपत्रेही शासनाला सादर करणार असल्याचे विल्ये दशक्रोशी रिफायनरी समर्थक समितीतर्फे जाहीर करण्यात आले.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या दणदणीत विजयानंतर महायुतीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानसभा समन्वयक प्रमोद जठार यांनी आता रिफायनरीतून रोजगाराचा हट्ट पूर्ण करणार अशी भूमिका कणकवली येथे जाहीर केली होती. २ लाख रोजगार देणारा हा प्रकल्प नाणार येथे व्हावा यासाठी नाणार परिसरातील जवळपास साडेआठ हजार एक जमीन मालकांनी यापूर्वीच आपली संमत्ती सरकारकडे नोंदवली आहे. तरी आता नव्याने स्थापन होणार्‍या महायुतीच्या सरकारने या जमीन मालकांच्या संमत्तीच्या आधारे हा प्रकल्प नाणार परिसरामध्ये राबवावा व कोकणातील जवळपास २ लाख युवक-युवतींना रोजगार द्यावा, अशी मागणी लावून धरत आपण येथील समर्थकांसह शासनदरबारी भेट घेणार असल्याचे जठार म्हणाले होते. त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत आम्ही रिफायनरी समर्थक नवनिर्वाचित स्थानिक आमदार किरण सामंत, रिफायनरी प्रकल्पाचे कट्टर समर्थक आमदार नितेश राणे, निलेश राणे यांच्यासह या प्रकल्पाचा सतत पाठपुरावा करणारे प्रमोद जठार या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वात नवनिर्वाचित सरकारकडे हा प्रकल्प नाणार परिसरात व्हावा, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे रिफायनरी समर्थक समितीतर्फे सांगण्यात आले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button