देवरुखातील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
देवरुख- संगमेश्वर रस्त्यावर साडवली साई नगर येथे मोटर सायकलचा भीषण अपघात झाला असून मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.आज रात्री ८ वा सुमारास गाय आडवी आल्याने तिला वाचवण्याच्या प्रयत्नात बाईकवरील तोल गेल्याने हा अपघात घडला.नाविद कापडी (अंदाजे वय ३२) रा. कांजीवरा (देवरुख) असे मृत तरुणाचे नाव आहे.