
खेड तालुक्यातील चोरद नदीपात्र दुषित होण्याचे प्रकार सुरूच
. खेड तालुक्यातील सुकिवली चोरद नदीपात्रात वाहने धुणार्यांचे प्रकार थांबेनासे झाले आहे. छोट्या मोठ्या वाहनांसह अजस्त्र क्रेन आदी वाहने वाहनचालकांकडून सर्रासपणे नदीपात्रात धुतली जात असल्याने पाणी दुषित होत आहे. प्रशासन वाहनचालकांवर कारवाईसाठी पुढाकारच घेत नसल्याने सार्यांचे फावत चालले असल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर धोक्याची टांगती तलवार कायमच आहे. www.konkantoday.com