
कोकणातील मराठ्यांना ईडब्ल्यूएस आरक्षण द्यावे-मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अॅड.सुहास सावंत
कोकणातील मराठा समाजाला आरक्षणाचा फायदा व्हावा यासाठी एथड (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) आरक्षण लागू करून शिक्षण आणि नोकरीत त्याचा लाभ मिळावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अॅड.सुहास सावंत यांनी केली आहे. हैदराबाद आणि सातारा गॅझेट कोकणाला लागू होण्याची शक्यता कमी असल्यामुळे आणि बहुतांश मराठा कुणबी दाखले घेण्यास तयार नसल्याने ही मागणी करण्यात आली आहे.अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित मराठा व्यावसायिक मेळावा आणि भवानी ऑनलाईन सर्व्हिसेस दालनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. हे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याहस्ते पार पडले.




