६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे रत्नागिरीत उद्घाटन
रत्नागिरी : ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला कालपासून (२६ नोव्हेंबर) रत्नागिरीतील स्वातंत्रवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी- रंगभूषाकार प्रकाश ठीक आणि मराठी नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. “यावर्षी राज्य नाट्य स्पर्धेत संघ कमी आहेत संघ कमी आहे. तसेच जास्तीत जास्त या पुढे होणाऱ्या स्पर्धेसाठी संख्या वाढावी यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे उत्सवी नाटकांचा महोत्सव घेण्यात येणार आहे”, असे कार्याध्यक्ष इंदुलकर यांनी सांगितले.
यावेळी शिवानंद चलवादी, कैलास टापरे, मीना वाघ, समीर इंदुलकर, राजेश गोसावी, प्रकाश ठीक, नंदू जुवेकर आणि दत्ता केळकर यांच्यासह रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी उपस्थित होते. रत्नागिरीत होत असलेल्या या राज्य नाट्य स्पर्धेत एकूण आठ नाटकांचा समावेश आहे.स्पर्धेची सुरुवात श्री शिवाई सहकारी पतसंस्था मर्यादित येळवण निर्मित ‘माझ्या आजीचा बॉयफ्रेंड’ या नाटकाने झाली. या नाटकाचे लेखक राजेश देशपांडे आणि दिग्दर्शक सचिन शिंदे आहेत.