
रत्नागिरी नगर वाचनालयाच्या पुनर्बांधणीसाठी मदत करण्याचे ऍड. दीपक पटवर्धन यांचे आवाहन.
रत्नागिरी जिल्हा नगर वाचकालयाच्या पुनर्बांधणीसाठी आर्थिक मदतीचे आवाहन अध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे. जुनी इमारत पाडण्याचे काम सुरू झाले आहे. नवीन बांधकामाची सुरूवात डिसेंबरच्या दुसर्या आठवड्यापासून करण्याचे नियोजन आहे. या दुमजली बांधकामासाठी ३ कोटींचे अंदाजपत्रक तयार झाले आहे. त्यापैकी १ कोटींची रक्कम आजपर्यंत जमा झाली आहे. उर्वरित २ कोटी उभे करणे आवश्यक आहेत. त्याकरिता मदतीचे आवाहन ऍड. पटवर्धन यांनी केले आहे. www.konkantoday.com