
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा मार्गावर वाहनचालकांची कसरत.
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याने घाटातून वाहतूक वळवण्यात आली आहे. कशेडी घाटातील मार्गासह कशेडी बंगला मार्गाची दयनीय अवस्थाच झाली असून वाहनचालकांची कसरतच सुरू आहे. खड्डेमय रस्त्यासह धुळीच्या साम्राज्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. बोगद्यातील वाहतूक बंद झाल्यापासून घाटातून मार्गस्थ होणार्या वाहनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. या मार्गावरून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.www.konkantoday.com