माजी आमदार श्री बाळ माने संघटना बांधणीसाठी उद्यापासून करणार सुरुवात
पराभवाने खचून न जाता पुन्हा जोमाने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते व समस्त नागरिकांसाठी देणार वेळ...
रत्नागिरी : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी आमदार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने हे विधानसभा निवडणूकीत पराभवाने खचून गेलेले नाहीत. तर पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी आता तर दररोज माजी खासदार विनायकजी राऊत यांचे संपर्क कार्यालयात वेळ देणार आहेत.पुन्हा जोमाने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणूका होणार असल्यामुळे हा निर्णय त्यांनी घेतला आहे. गावागावात पक्ष बांधणीसाठी शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांचे संपर्क कार्यालय, अभ्युदय नगर, नाचणे रोड रत्नागिरी येथील कार्यालयात बुधवार, गुरुवार व शुक्रवार असे आठवड्यातून तीन दिवस सकाळी 10.00 ते 12.00 वा. आणि सायं.05.00 ते 07.00 वा.पर्यंत या वेळेत उपलब्ध असणार आहेत. पदाधिकारी, कार्यकर्ते व समस्त नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन बाळ माने यांनी केले आहे.