मतदान काळात दुकाने बंद ठेवल्याने दापोली व्यापारी संघटनेकडून नुकसान.
भरपाईची मागणीदापोली तालुक्यातील मतदान केंद्रापासून शंभर मीटर परिसरातील आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर मतदान केंद्राजवळील दुकानदारांना पोलीस स्थानकांकडून नोटीस पाठवून मतदानाच्या दिवशी सकाळी सात ते सायंकाळी मतदान संपेपर्यंत दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचेही नमूद केले. यामुळे येथील व्यापारी संघटनेकडून त्या दिवसाची नुकसानभरपाई व भत्ता देण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.www.konkantoday.com