निवडणूक ते हरले की हरवले गेले, हा प्रश्नच, माजी आमदार संजयराव कदम.
संपूर्ण राज्यामध्ये दिग्गज नेतेही विधानसभेची निवडणूक हरले आहेत. हे निवडणूक ते हरले की हरवले गेले, हा प्रश्नच आहे. आपण दापोली विधानसभा मतदार संघात समोरच्या बलाढ्य उमेदवाराला कडवी झुंज दिली असून आपण कोणत्याही प्रकारे कोठेही कमी पडलेलो नाही, त्यामुळे निवडणुकीत जय पराजय होतच असतो. आपण त्याने खचून जाण्याची गरज नाही.
जे झाले ते झाले पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागू या आणि पुन्हा एकदा माणुसकीला जिंकण्यासाठी सज्ज होवू या, असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार संजयराव कदम यांनी दापोलीत कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केला.www.konkantoday.com