खेड शहरातील जगबुडी नदीकिनारी असलेल्या स्मशानभूमीत मद्यपींचा अड्डा
खेड शहरातील जगबुडी नदीकिनारी असलेली स्मशानभूमी मद्यपींचा अड्डा बनली आहे. स्मशानभूमीत असलेल्या झाडाखाली मद्यपींचा दिवस-रात्र वावर सुरू असतो. रस्त्यालगत मद्याच्या बाटल्यांसह प्लास्टिक बाटल्यांचा खच पडला आहे. या मद्यपींवर कारवाईसाठी नगर प्रशासनाला सवडच मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.नगर परिषद हद्दीतील जगबुडी नदीकिनारी ३ स्मशानभूमी आहेत. एका स्मशानभूमीनजिक ३ महाकाय वृक्ष आहेत.
या वृक्षाखाली अनेक जण विसावा घेण्यासाठी जातात. याच ठिकाणी मद्यपींचा वावर देखील वाढला आहे. दिवसभर मद्यपी याच वृक्षाखाली मद्य रिचवत असल्याची बाब समोर आली आहे. मद्य रिचवल्यानंतर मद्याच्या बाटल्या फोडण्याचे प्रकार देखील केले जात आहेत. यामुळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार दरम्यान ये-जा करणार्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.www.konkantoday.com