
औद्योगिक प्रशिक्षण संस्था. 28 नोव्हेंबर पर्यंत निविदा स्वीकारणार.
रत्नागिरी, दि. 25 : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नगिरी यांच्याकडून अनुभवी आहार व्यवस्था ठेकेदाराकडून महाराष्ट्र पध्दतीचे जेवण, चहा, कॉफी, अल्पोपहाराचे पदार्थ इ.पुरविण्यासाठी आणि ज्यांना शासकीय/खासगी उपहारगृह चालविण्याचा अनुभव आहे, असे बचतगट तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील क्राप्टसमन फूड प्रॉडक्शन ( General ) व्यवसाय पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांकडून सिलबंद निविदा दि. 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वा. पर्यंत मागविण्यात येत आहेत. तरी पात्र आहार व्यवस्था ठेकेदारांनी विहीत मुदतीत निविदा सादर कराव्यात, असे आवाहन प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी केले आहे.
निविदा नमुना, अटी व सूचना या संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. प्राप्त झालेल्या निविदा दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजता उघडण्यात येतील. सर्व निविदा कोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने राखून ठेवला आहे.0000