एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला आहे. महायुतीमधून भाजपचा जो कोणी उमेदवार मुख्यमंत्रीपदासाठी निवडला जाईल, त्याला आपण पाठिंबा देणार, असे आज शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही पुढील पाच वर्षे एकत्र काम करु, त्यांनी मला अडीच वर्षे पाठिंबा दिला, आम्ही खूप चांगले काम केले, असे शिंदे यांनी म्हटले आहे. त्यामुळे लवकरच आता नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होणार आहे.