भास्कर जाधव लाल दिव्यासाठी मागणी करणार
राज्यात महाविकास आघाडीतील एकाही घटक पक्षाकडे विधानसभेच्या एक दशांश आमदार नसल्याने विरोधी पक्षनेते पदावरून पेच निर्माण झाला आहे.शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडे २०, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडे आणि काँग्रेसकडे १६ आमदार असल्याने कोणत्याच पक्षाकडे नियमानुसार विरोधी पक्षनेते पद देता येणार नाही. मात्र, असे असले तरीही शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडून विरोधी पक्षनेते पदासाठी मागणी केली जाणार आहे. याबाबत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी भाष्य केलं आहे.राज्य विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी २९ आमदारांचे संख्याबळ आवश्यक आहे.
पण कोणत्याच पक्षाकडे २९ आमदार नसल्याने यंदा विधानसभेत विरोधी पक्षनेता नसणार. परंतु, याबाबत भास्कर जाधव म्हणाले, “आम्ही जरूर शपथविधी झाला, विधानसभेच्या अध्यक्षांची निवड झाली, मुख्यमंत्री पदाची शपथ झाली की विद्यमान सरकार आणि विधानसभेच्या अध्यक्षाकडे विरोधी पक्षनेते पद मिळावं याची मागणी करणार आहोत.दिल्लीतही आप सरकारने भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसताना विरोधी पक्षनेतेपद दिले होते. राज्यातील महायुतीचे सरकार पुरेसे संख्याबळ नसताना किंवा महाविकास आघाडीचे एकत्रित संख्याबळ मान्य करणार का, हा प्रश्न आहे.