गोवळकोट परिसरात मगरींचे साम्राज्य, मगरींपासून संरक्षणाची मागणी
चिपळूण शहरातील गोवळकोटकडे जाणार्या रस्त्यालगत असलेल्या मोरीजवळच्या नाल्यात २५ पेक्षा जास्त मगरी असून या मगरीमुळे येथे मॉर्निंग वॉकसाठी येणारे नागरिक, लगतचे शेतकरी व जनावरांच्या जीवाला धोका आहे. तरी येथील नाल्याभोवती लोखंडी जाळी लावून मगरीचे येथे संवर्धन व संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
गोवळकोटकडे जाणार्या रस्त्यावर नाल्यात २५ ते३० पेक्षा जास्त मगरी असल्याचे आढळतात. येथे पूर्वी शेतकर्यांची जनावरे पाणी पिण्यासाठी येत असत. परंतु आता मगरींची संख्या वाढल्याने गुरे येथे पाणी पिण्यासाठी येण्यास धजावत नाहीत.www.konkantoday.com