
राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील खो-खो पट्टू रिध्दी चव्हाणचा समावेश
अलीगड (उत्तरप्रदेश) येथे २५ ते २९ या कालावधीत होणाऱ्या ४३ व्या कुमार आणि मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे कुमार आणि मुली संघ रविवारी विमानाने रवाना झाला.या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील खो-खो पटून रिध्दी चव्हाणचा समावेश आहे. राज्य स्पर्धेत केलेल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर तिची महाराष्ट्र संघात वर्णी लागली आहे.उत्तरप्रदेश अलीगड येथील महाराणी अहिल्याबाई होळकर स्टेडीयममध्ये या स्पर्धा होणार आहेत. धाराशिवचे भरतसिंग वसावे आणि सुहानी धोत्रे यांची अनुक्रमे कुमार आणि मुली संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या इतिहासात प्रथमच खेळाडूंना विमानाने प्रवासाची सुविधा मिळाली दिली असून त्यासाठी राज्य संघटनेचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजित जाधव आणि त्यांच्या सहकार्यांनी विशेष नियोजन केले आहे.