रत्नागिरी शहरात दोन घरफोड्या, चार लाखाचा ऐवज लंपास.

रत्नागिरी शहरातील श्रीराम नगर नाचणे आणि गणेश कॉलनी येथील दोन सदनिका फोडून अज्ञाताने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा तब्बल 4 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला.फिर्यादी महिला (38,रा.श्रीराम नगर नाचणे, रत्नागिरी ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या कुटुंबियांसह बाहेर गेलेल्या असताना अज्ञाताने त्यांच्या सदनिकेच्या दरवाजाची कडी-कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 3 लाख 59 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. त्यानंतर चोरट्याने गणेश कॉलनीकडे आपला मोर्चा वळवत येथील नागेश गजबार (29) यांची सदनिका फोडून 82 हजार 500 रुपयांचा असा दोन्ही ठिकाणचा एकूण 4 लाख 41 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अज्ञाता विरोधात शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 305 (अ),331 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button