
दापोली समुद्रकिनारी घडू लागले आहे डॉल्फिनचे दर्शन.
नुकत्याच सुरु झालेल्या थंडीच्या हंगामात दापोलीतील समुद्र किनार्यावर डॉल्फिनचे दर्शन घडू लागले आहे. डॉल्फिनसाठी हा प्रजनन काळ असल्याने येथील किनारी डॉल्फिन सहज पहायला मिळत आहेत.सध्या पर्यटकांसाठी येथील समुद्रात विहार करताना दिसणारे डॉल्फीन ही पर्वणी ठरत आहे.दापोलीतील समुद्रकिनारी डॉल्फिनच्या जलविहार दरम्यानच्या कसरती पाहण्यासाठी सध्याचा कालावधी अतिशय योग्य मानला जातो. जास्तीत -जास्त पर्यटकांनी या ठिकाणी येऊन डॉल्फिन दर्शनाचा आनंद घ्यावा, अशी स्थिती आहे.दापोलीती तालुक्यात डॉल्फिन पाहण्यासाठी लाडघर बीच, कर्दे बीच, मुरुड बीच,पाळंदे बीच तसेच आंजर्ले हे किनारे किनारे प्रसिद्ध आहेत.