
कोणी वेडवाकडं वागेल तर त्याचा जागेवरच बंदोबस्त करणार-निलेश राणें.
राणे बंधुंचा आता विधानसभेत आवाज घुमणार आहे. विधानसभेत कोणी काही वेडंवाकडं बोललं तर त्याला जागेवरच धडा शिकवू असे वक्तव्य निलेश राणें यांनी केले आहे. निलेश राणे म्हणाले की दहा वर्षांनतर मी या पदावर आलो आहे, पण पद हे मिरवण्यासाठी नसतं तर काम करण्यासाठी असतंविधीमंडळ हे महाराष्ट्राचे आहे त्याला एक वेगळं महत्व आहे. म्हणून मला वाटतं आहे की मला माझ्या मतदारसंघासाठी काम करायचं आहे, दोन्ही राणे बंधु एकाच बाकावर बसतील तेव्हा ठाकरेंना घाम फुटणार का या प्रश्नावर ते म्हणाले की ते आता विधिमंडळात गेल्यावर कळेल, पण कोणी वेडवाकडं वागेल तर त्याचा जागेवरच बंदोबस्त करणार असा, धमकीवजा इशाराच निलेश राणेंनी दिला.




