
उदयजी सामंत ह्यांनी मा. देवेंद्रजी फडणवीस ह्यांची सदिच्छा भेट घेतली.
आज मा. उदयजी सामंत ह्यांनी मा. देवेंद्रजी फडणवीस ह्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 15 पैकी 14 जागा महायुतीच्या निवडून आणण्यामध्ये मा. उदयजी सामंत ह्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे गौरवोद्गार मा. देवेंद्रजी फडणवीस ह्यांनी काढले व मा. देवेंद्रजी ह्यांनी मा. उदयजी सामंत ह्यांचा त्याबद्दल सत्कार केला. त्यावेळी पूर्ण कोकणामध्ये भाजप ने विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने काम केल्याबद्दल मा. उदयजी सामंत ह्यांनी मा. देवेंद्रजी फडणवीस ह्यांचे आभार मानले.