
ईव्हीएम हॅक होतं किंवा अदलाबदली होते, यावर 100 टक्के लोकांचा विश्वास बसलाय.- किरण माने
विधानसभेचा निकाल जरी लागला असला तरीही आरोप-प्रत्यारोपांचा राजकारण काही थांबलेलं नाहीये. आता यावर एका मराठी अभिनेत्याची पोस्ट बरीच चर्चेत आलेली आहे. अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी ही पोस्ट केलेली आहे.किरण माने हे ठाकरे गटाचे नेतेही आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात किरण माने यांनीही महाविकास आघाडीसाठी जोरदार प्रचार केला होता. खणखणीत भाषणं देखील त्यांनी केली होती. पण निकालानंतर या निकालावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अनेक पोस्ट त्यांनी लिहिल्या आहेत.
अशीच त्यांची एक पोस्ट सध्या चर्चेत आलेली आहे.किरण माने यांची पोस्ट नेमकी काय?किरण माने यांनी एक्स पोस्ट करत म्हटलं की, ईव्हीएम हॅक होतं किंवा अदलाबदली होते, यावर 100 टक्के लोकांचा विश्वास बसलाय. सगळेच अस्वस्थ आहेत. संवेदनशील लोक, हे बंद होण्यासाठी मोठं आंदोलन उभं राहिलं पाहिजे, म्हणून अस्वस्थ आहेत… कोडगे कारस्थानी लोकं, यावर बोलून का बिंग फोडकाय? हे तोंड बंद ठेवून निर्णय मान्य करा,म्हणून अस्वस्थ आहेत..!