
देशाच्या विरोधात असं कोणी निर्णय घेतं तर तिथे राजकारण करायचं नसतं-शरद पवार.
अतिरेक्यांनी जी अॅक्शन घेतली ती भारताच्या विरोधी घेतली आहे. देशाच्या विरोधात असं कोणी निर्णय घेतं तर तिथे राजकारण करायचं नसतं. त्या दृष्टीने आम्ही लक्ष घातलं आहे. सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली, त्यामध्ये आमच्या पक्षाच्या वतीने सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.पण सरकारने हे अधिक गांभीर्याने घ्यायला पाहिजे. पण गेले काही दिवस सरकारच्या वतीनं सतत सांगितलं जात होतं. आम्ही दहशतवाद मोडून काढला, दहशतवाद आम्ही संपवला’, असं म्हणत शरद पवारांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं. ते आज सिंधुदुर्ग येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
केंद्रीयमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याविषयी त्यांना प्रश्न केला असता ते म्हणाले की, ‘आज ज्यांनी हल्ला केला त्यांना शोधायला हवं हा प्रश्न महत्त्वाचा आहे. मी आज कोणाला काढा, कोणाला सोडा याबद्दल मी बोलणार नाही,’ असं म्हणत शरद पवारांनी स्पष्टच उत्तर दिलं. ‘पण घडलेली घटना बघितल्यानंतर कुठे ना कुठे कमतरता आहे हे स्पष्ट आहे. ही कमतरता सरकारने घालवायला हवी. सरकारने अधिक गांभीर्याने घ्यावे. सरकार कमतरता आहे हे मान्य करत असेल तर त्यांनी तातडीने पावले टाकावीत. काही कामात आम्हा लोकांचं देखील सहकार्य राहील’, असंही पवारांनी बोलून दाखवलं.