
वाहतूक पासचा गैरवापर करणाऱ्या चालकाची गाडी जप्त
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी/जिल्हाबंदी असताना अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक पासच्या माध्यमातून वाहतूक करण्यास सवलत देण्यात आली आहे.परंतु आता या पासचा गैरवापर होताना मोठय़ा प्रमाणात दिसत आहे.सुभाष लक्ष्मण गंगावणे राहणार लांजा यांनी मेडिकल कारणास्तव काढलेल्या वाहतूक पासचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे.याबाबत पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की मुर्शी चेक पोस्ट (साखरपा) येथे दि. ४/४/२०२० रोजी १८.०५ वा.चे सुमारास इनोव्हा गाडी नंबर एम एच १३ एसी ९५३९ या गाडीचा क्यूआर कोड पासची खात्री करता सदरचा पास लांजा ते रत्नागिरी या मार्गासाठी असल्याचे व तो मेडिकल कारणास्तव काढल्याचे आढळून आले. सदर वाहनावरील चालक सुभाष लक्ष्मण गंगवडे रा. लांजा यांनी सदरचे वाहन पासवरील मार्गाने न चालवता ते रत्नागिरी कोल्हापूर या दुसऱ्या मार्गाने चालवून पासचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सदरचे वाहन मोटार वाहन कायदा कलम 207 प्रमाणे जप्त करून कारवाई करण्यात आलेली आहे.वाहतूक पासचा कोणीही गैरवापर करू नये असे देखील पोलिसांकडून आव्हान करण्यात आले आहे.
www.konkantoday.com