
राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई या संस्थेने इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या सहकार्याने वाटूळ-दाभोळ रस्त्यावर ५०० वृक्षांची लागवड.
राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई या संस्थेने इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या सहकार्याने वाटूळ-दाभोळ रस्त्यावरील विलवडे व्हेळ व वाघणगाव येथे वड, पिंपळ, चिंच, काजरा, ताम्हण, अशा स्थानिक ५०० वृक्षांची लागवड केली आहे. त्या परिसराला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी भेट देवून संस्थेमार्फत लागवड केलेल्या झाडांची पाहणी केली.देशी वृक्षांच्या लागवडीसाठी पुढाकार घेण्यासाठी गेले काही दिवस स्थानिक संस्थांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचा समावेश आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी काम करणार्या या संघाने वृक्ष लागवडीसाठी वाटूळ-दाभोळ या रस्त्यासाठी निवड केली. रस्त्याच्या बाजूला जागा असल्याने तिथे रोपांचे संगोपन करणे सहज सोपे होते.
त्याचबरोबर जमिनही देशी वृक्षांच्या लागवडीसाठी पोषक असल्यामुळे ती जोपासणे सोपे आहे. पावसाळ्यात लागवड केलेली रोपं व्यवस्थित जगतात, त्यामुळे संघाने योग्य नियोजन करून लागवडीचा उपक्रम हाती घेतला. लागवड केलेली रोपं जगली आहेत. संघाने राबवलेल्या या उपक्रमाची सीईओ पुजार यांनी पाहणी केली. www.konkantoday.com