
गुहागरमधून अमूर ससाणा ५ दिवसांनी सोमलियात दाखल
. उपग्रहाद्वारे टॅग केलेल्या दोन अमूर ससाण्यांपैकी एकाने गुहागर समुद्र किनार्यावरून हवेत झेप घेतली. तो तब्बल ५ दिवस १७ तासांच्या अथक प्रवासानंतर अरबी समुद्राच्या पार सोमालियात मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्याचची नोंद झाली आहे.वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार अमूर ससाण्याला संरक्षित पक्षी म्हणून मान्यता देण्यात आली आहे. हे पक्षी आग्नेय आशिया आणि इशान्य चीन यामध्ये प्रजननाच्या ठिकाणी उन्हाळ्याचा ऋतु घालवतात. हे पक्षी आफ्रिकेतील मैदानांवर हिवाळ्यात राहणे पसंत करतात. या पक्षांच्या परतीचा प्रवास एप्रिल मेमध्ये अफगाणिस्तान आणि पूर्व आशियामधून सुरू होतो. सुमारे २० हजार किलोमीटरचा वार्षिक प्रवास हे पक्षी करतात.
दरम्यान ते भारताच्या ईशान्य क्षेत्रात तसेच सोमालियामध्ये थांबतात.मणिपूरच्या तामेंगलॉंग जिल्ह्यातील एका गावाच्या नावे दोन अमूर ससाणा पक्षांना उपग्रहाद्वारे टॅग करण्यात आले. पक्षांच्या स्थलांतराच्या मार्गावर वाईड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था लक्ष ठेवत असते. या संस्थेचे शास्त्रज्ञ सुरेश कुमार म्हणाले चिउलिआन दोनने रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे विनाथांबा प्रवास सुरू केला. हा पक्षी सोमालिया येथे पोहोचला. www.konkantoday.com