
खेड पंचायत समितीची ६ निवासस्थाने ओस.
खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या समर्थनगर येथील निवासस्थानाची पुरती पडझड झाली आहे. याच निवास्थानासमोर सुस्थितीतील ६ निवसस्थाने असतानाही या ठिकाणी एकही अधिकारी अथवा कर्मचारी वास्तव्यास नसल्याने निवासस्थाने ओस पडली आहेत. निवासस्थानासमोरील मोगळ्या जागेचा वापर वाहनांच्या पार्किंगसाठी केला जात आहे. मोकाट जनावरांनीही याच जागाचा आसरा घेतल्याने दुर्गंधी पसरली आहे.समर्थनगर येथील गटविकास अधिकार्यांच्या निवासस्थानाची सप्टेंबर महिन्यात झालेल्या वादळीवार्यासह पर्जन्यवृष्टीत पुरती पडझड झाली. निवासस्थानावर महाकाय वृक्ष कोसळून पूर्णतः जमीनदोस्त झाले.
या निवासस्थानांच्या डागडुजीअभावी गटविकास अधिकारी निवासस्थानात वास्तव्यही करत नव्हते. निवासस्थानावर महाकाय वृक्ष कोसळून दीड महिन्यांचा कालावधी लोटूनही कोसळलेला वृक्ष जैसे थे होता. अखेर प्रशासनावर टीकेची झोड उठल्यानंतर वृक्ष हटविण्यात आला. सद्यस्थितीत निवासस्थान पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. या निवासस्थानाची दुरूस्ती अथवा नव्याने उभारणी कितपत होईल, हा प्रश्नच आहे. www.konkantoday.com