
कोकणात थंडीच्या चाहुलीने बागायतदारांची लगबग.
कोकणातील पावसाळा ओसरताच गारठा वाढू लागला आहे. थंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पहाटेच्या थंडीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे येथील आंबा व काजू बागायतदारांच्या हालचालींना वेग आला आहे. थंडीची चाहूल लागताच बागायतदारांनी झाडांवर फवारणीसाठी तयारी सुरू केली आहे. बागायती पिकांवर येणार्या संभाव्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्यवेळी फवारणी करणे आवश्यक आहे. थंडीमुळे कीड आणि रोग नियंत्रणासाठी लागणार्या रसायनांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. सध्या जिल्ह्यातील वातावरण बदलत असल्याने बागायतदारांसाठी हा काळ अतिशय महत्वाचा ठरणार आहे. योग्य काळजी घेतल्यास आगामी हंगामासाठी काजू आणि आंबा बागा चांगली फळधारणा करतील, असा विश्वास बागायतदारांकडून करण्यात येत आहे. www.konkantoday.com