अखेर खेड नगर परिषदेकडून जिजामाता उद्यानाची स्वच्छता

खेड नगरपरिषदेच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रबोधनकार ठाकरे उद्यानाची दयनीय अवस्था झाली होती. उद्यानातील परिसर गवताच्या वेढ्यात अडकला होता. आधीच उद्यानात खेळण्यांची कमतरता आहे. त्यात अस्वच्छतेची भर पडल्यान उद्यानाला बकालपणा आला होता. उद्यानाच्या स्वच्छतेसाठी नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांना अखेर शुक्रवारी मुहूर्त मिळाला.सायंकाळच्या सुमारास स्वच्छता कर्मचारी उद्यानाची स्वच्छता करत परिसर चकाचक केला.

जिजामाता उद्यानात बच्चे कंपनीसाठी खेळण्यांचा थांगपत्ताच नाही. बसण्यासाठी आसने देखील उपलब्ध नाहीत. उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा असून या ठिकाणी सतत वर्दळ सुरू असते. मात्र उद्यानात खेळणीच नसल्याने बच्चे कंपनीने पाठ फिरवली होती. उद्यानाच्या स्वच्छतेकडे नगर परिषद प्रशासनाने केलेल्या दुर्लामुळे उद्यान अस्वच्छतेच्या विळख्यात अडकले होते. त्यामुळे नाराजी व्ययक्त केली जात होती. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button