
जिल्हा कॉंग्रेसमध्ये तटागटाचे राजकारण सुरू, चिपळूण शहराध्यक्षपदाचा वादही पेटला
रत्नागिरी जिल्ह्यातील कॉंग्रेसला सध्या गटातटाच्या राजकारणाने ग्रासले आहे. जिल्हाध्यक्ष ऍड. विजयराव भोसले यांनी आपला कार्यभार स्विकारल्यानंतर संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने पावले उचलली. त्याचाच भाग म्हणून अनेक ठिकाणी पदाधिकार्यांच्यात बदल करण्यात आले. रत्नागिरी तालुका कार्यकारिणी देखील बरखास्त केल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र त्यावरूनही वाद निर्माण होवून जिल्हाध्यक्षांना अशा प्रकारचा अधिकार नसल्याचे विरोधी गटाकडून सांगण्यात येत होते. हा वाद सुरू असतानाच आता चिपळूण येथेहे शहर अध्यक्षपदावरून वाद सुरू झाला आहे. जिल्हाध्यक्षांनी नवनिर्वाचित शहराध्यक्ष म्हणून लियाकत शहा यांची नियुक्ती केली आहे. मात्र नवनिर्वाचित अध्यक्ष निवडताना तालुकाध्यक्षांना विश्वासात घेतले नसल्याची तक्रार होत असून शहर अध्यक्ष म्हणून पुर्वीचेच रतन पवार हेच असल्याचे पत्र तालुकाध्यक्षांनी दिल्याचे शोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे चिपळूणात देखील आता वादाला तोंड फुटले आहे.
www.konkantoday.com