266 रत्नागिरी विधानसभा मतदार संघ सर्वाधिक 1 लाख 11 हजार 335 मते मिळवून उदय सामंत विजयी

रत्नागिरी, दि. 23 :- 266 रत्नागिरी विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 1 लाख 11 हजार 335 मते मिळवून उदय रविंद्र सामंत हे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी घोषित केले. बाळ माने यांना दुसऱ्या क्रमांकाची 69 हजार 745 इतकी मते मिळाली.

येथील सामाजिक न्याय भवन मध्ये आज सकाळपासून मतमोजणीला प्रारंभ झाला. यावेळी निवडणूक सामान्य निरीक्षक जनक प्रसाद पाठक, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी भेट देऊन मतमोजणी प्रक्रियेची पाहणी केली. पहिल्या फेरीपासूनच श्री. सामंत हे आघाडीवर होते. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. देसाई यांनी मतमोजणी नंतर सर्वाधिक मते मिळालेल्या श्री. सामंत यांना विजयी घोषित केले. यानंतर त्यांनी प्रमाणपत्र आणि बुके देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी निवडणूक सामान्य निरीक्षक श्री. पाठक उपस्थित होते.

उमेदवार निहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे –

उदय रविंद्र सामंत – 1,10,327, टपाली मते-1008 एकूण 1,11,335, बाळ माने – 68,854, टपाली मते- 891 एकूण – 69,745, भरत सीताराम पवार – 972, टपाली मते – 30 एकूण 1002, कैस नुरमहमद फणसोपकर – 306, टपाली मते – 3 एकूण 309, कोमल किशोर तोडणकर – 188, टपाली मते – 6, एकूण 194, ज्योतीप्रभा प्रभाकर पाटील -1043, टपाली मते-18, एकूण 1061, दिलीप काशिनाथ यादव – 275, टपाली मते – 5, एकूण 280, पंकज प्रताप तोडणकर – 599, टपाली मते -4, एकूण 603.

नोटा – 3029, टपाली मते 44 एकूण 3073, एकूण वैध मते – 1,85,593, टपाली मते- 2009, एकूण 1,87,602, अवैध मते – टपाली मते 306,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button