हा विजय मला आत्मचिंतन करायला लावणारा आहे-शेखर निकम.

चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीचा निकाल आज जाहीर झाला. सुरुवातीला आघाडी मिळवलेल्या प्रशांत बबन यादव यांना अखेर पर्यंत आघाडी राखण्यात यश लाभले नाही.याचाच फायदा प्रतिस्पर्धी उमेदवार शेखर निकम यांना झाला. चिपळूणकरांनी शेखर निकम यांच्या पाठीशी उभे रहाणे पसंत केले नाही. त्यांनी भरभरून मतदान प्रशांत बबन यादव यांच्यासाठी केले. असे असले तरी संगमेश्वर तालुक्यातील दोन्ही उमेदवारांना लाभलेला संमिश्र प्रतिसाद कुणाच्या एका बाजूने झुकेल असे दिसत नव्हते. अशा स्थितीत देवरूख पट्ट्यातील सामान्य कार्यकर्त्यांनी लावलेला जोर आजच्या यशाचे गुपित आहे.

आज पत्रकारांना संबोधित करताना आमदार शेखर निकम म्हणाले की हा विजय मला आत्मचिंतन करायला लावणारा आहे. सरळमार्गी केवळ विकास कामांवर निवडणूक जिंकली जात नाही हे मला चिपळूणकरांनी दिलेल्या प्रतिसादातून कळले. चिपळूण, सावर्डे इथे विकासकामे करुनही अपेक्षित प्रतिसाद लाभला नसल्याचे त्यांनी बोलून दाखविले.आपल्या मनोगतात त्यांनी देवरूख येथील गावा खेड्यातील कार्यकर्ते यांनी ही निवडणूक मला जिंकून दिली असे त्यांनी सांगितले.

महायुतीच्या सर्व घटकांनी योग्य त्या प्रकारे काम केले. म्हणून हा विजय शक्य झाला. विजय हा विजय असतो! त्यामुळे ते मताधिक्य किती हा विषयच नाही. असे शेखर निकम म्हणाले. पुढील पाच वर्षांत चांगल्या पद्धतीने काम करण्याची आणिमहायुतीची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले. खरोखरच हा विजय काहीसा बोलका आहे. मताधिक्याची आकडेवारी स्पष्ट संकेत देते की आत्मचिंतन करावे! जनता का विरोधात गेली ते तपासून पाहावे!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button