
सर्व मतदारांचे मन:पूर्वक आभार : रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासासाठी, स्थानिक भूमिपुत्राच्या हक्काच्या, माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या माय-बाप जनतेचे मन:पूर्वक आभार !
महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला दिलेल्या अपार प्रेमाबद्दल जितके आभार मानावे तितके कमीच आहेत. महाराष्ट्रातील सुजाण जनतेने विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मतदान केले आहे. टोमणे, फेक नॅरेटिव्ह, आणि विकासविरोधी आघाडीच्या अपप्रचाराला त्यांनी ठामपणे नाकारले आहे.“महाराष्ट्रातील उद्योग बाहेर गेले” किंवा “पक्ष पळवला” अशा निराधार चर्चांना या निवडणुकीने पूर्णविराम दिला आहे. महाराष्ट्र आज देशातील सर्वाधिक गुंतवणूक आणणारे राज्य ठरले आहे. या लौकिकाला पुढे नेण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत राहू.
पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सक्षम नेतृत्वाला महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी जो भरभरून आशीर्वाद दिला आहे, तो खरोखर प्रेरणादायक आहे.रत्नागिरीच्या जनतेनेही राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात आपले मोलाचे योगदान दिले आहे. सामंत बंधूंच्या मागे रत्नागिरीकरांनी दाखवलेले प्रेम व पाठिंबा आम्हाला सदैव नवी ऊर्जा आणि प्रेरणा देत राहील. या अभूतपूर्व विजयाबद्दल मी आजन्म आपल्या ऋणात राहू इच्छितो ! पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार !आपला,*उदय सामंत*