राजापूर मतदार संघांत विद्यमान आमदार राजन साळवी पराभूत, शिंदे शिवसेनेचे किरण सामंत 19986 मतांनी विजयी
राजापूर लांजा साखरपा विधानसभा निवडणुकीत महायुतीचे किरण सामंत यांनी महाविकास आघाडीच्या राजन साळवी यांचा १९९७४ मतांनी पराभव केला. राजन साळवी यांना पराभूत करून किरण सामंत यांनी कोकणात उबाठाप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिलेला हा मोठा धक्का आहे. राज्यात व कोकणातील जनतेने महायुतीला भरभरून प्रतिसाद दिला असून त्याचे फलीत म्हणून राजापूर लांजा साखरपा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांच्या पदरात पडलेले मताधिक्य आहे. भावनिक दृष्ट्या राजकारण करून मतदारसंघात विकास न करता निवडणूक जिंकणाऱ्या राजन साळवी यांना यावेळी मतदारांनी नाकारले आहे.
विकासाचा अजेंडा घेऊन किरण सामंत यांनी ही निवडणूक लढवली. लांजा राजापूर साखरपा मतदारसंघातील जनतेने भावनिक राजकारणाला नाकारून विकासाची साथ दिली त्यामुळे माझा विजय झाला. या विजयात महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा, मतदारांचा मोलाचा वाटा आहे. या सर्वांच्या ऋणात मी कायम राहू इच्छितो. असे किरण सामंत म्हणाले मतदारसंघाच्या विकासासाठी माझ्यावरती जनतेने दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवेन, ही प्रतिक्रिया किरण सामंत यांनी दिली.