
मंत्री दीपक केसरकरांची ठाकरे गटाच्या राजन तेली यांच्यांवर मात.
सावंतवाडी मतदारसंघाच्या चौरंगी लढतीमध्ये मंत्री दीपक केसरकरांनी तब्बल 39899 मतांनी ठाकरे गटाच्या राजन तेली यांच्यांवर मात केली आहे.दीपक केसरकर यांना 81008 मते मिळाली तर राजन तेलींना 41109 मते मिळाली.सावंतवाडी मतदारसंघामध्ये प्रमुख लढत ही शिवसेना शिंदे गटाचे दिपक केसरकर विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे राजन तेली यांच्यात असली तरीही या लढतीमध्ये सर्वात मोठी भूमिका ही अपक्ष उमेदवार विशाल परब आणि अर्चना घारे परब ठरतील असा होरा होता. त्यात विशाल परब यांनी 33281 मते मिळवली मात्र अर्चना घारे परब यांना केवळ 6174 मतांवर समाधान मानावे लागले.