
देवरूखसाठी ४५ कोटींची पाणी योजना**आराखडा मंजूर; २४ तास होणार पाणी पुरवठा
देवरूख शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेवून पुढील ३० वर्षाचा विचार करून नगरपंचायतीने ४५ कोटी रुपयांचा नळपाणी पुरवठा योजनेचा आराखडा मंजूर केला आहे.यासाठी नव्या पाणी साठवण टाक्यांची उभारणी करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभागासाठी ही सोय होणार आहे. पाणी पुरवठा २४ तास व्हावा यासाठी वांझोळे-बावनदी येथे बंधारा बांधण्यात येणार आहे. यासाठी अंदाजे १० कोटी रुपये खर्च येणार आहे. देवरूख शहरासाठी २४ तास पाणी पुरवठा करणारी पाणी योजना नगरपंचायतीतर्फे राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी नवीन बंधाऱ्याची असलेली गरज ओळखून मधल्या काळात पालकमंत्री उदय सामंत यांनी सहा कोटीचा निधी मंजूर केला होता. हा बंधारा बाधंण्यापूर्वी साईट सर्वेक्षणाचे काम जलसंपदा विभागाकडून चालू झाले आहे.www.konkantoday.com