
विपुल साळवी यांची मालगुंडच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड
रत्नागिरी ः रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड ग्र्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विपुल साळवी यांची बिनविरोध निवड झाली. याआधीचे उपसरपंच युगा सुर्वे यांनी आपल्या कारकिर्दीचा कालावधी संपल्यानंतर राजीनामा दिला होता. त्यानंतर निवडणूक लागली होती. यात साळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.